नवी मुंबईत शिंदेसेना-भाजप युती फिस्कटली; दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार..

Jan 1, 2026 - 12:22
 0  1
नवी मुंबईत शिंदेसेना-भाजप युती फिस्कटली; दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार..

नवी मुंबई : शिंदेसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेली युतीची चर्चा अखेर पूर्ण विराम लागला. जागा वाटपाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होत होत्या. पण भाजपने फक्त २० जागा देण्याची तयारी दाखवल्यामुळे अखेर युती तुटली आहे.

नवी मुंबईत भाजप आणि शिंदेसेना यांच्यात चुरस आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. युतीसाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जागा वाटपासाठी दोन बैठका घेतल्या. शिंदेसेनेकडे ५५ आणि भाजपकडे ५६ माजी नगरसेवक आहेत. शिंदेसेने मागणी करत होती की, पूर्वीच्या नगरसेवकांच्या जागा त्यांच्याच पक्षाला दिल्या जाव्यात.भाजपने नवी मुंबईत शिंदेसेनेला फक्त २० जागा देण्याची तयारी दाखवली, त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

युती तुटली हे अधिकृत जाहीर न करता दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow